Sunday, August 14, 2011

तूच तुझ्या कर्माचा शिल्पकार

तिला खाण्या-खिलवण्याची फार आवड आहे. कुठे काही पाककृती आढळली तर ती करून बघणारच. असाच एकदा एका मैत्रिणीकडे तिला नवीन पाककृती सापडली, लगेच तिने तिच्या डायरी मध्ये लिहून घेतली. आता घरी येऊन जेंव्हा ती तो पदार्थ करेन तेंव्हा तिच्या हे लक्ष्यात नाही येणार की ह्या steps आपणच लिहिल्या होत्या. ती त्या steps करत जाईल, जणू काही कोणीतरी त्या तिच्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. तिनेच तिचे कार्य मांडून ठेवले असते पण तिच्या ते लक्ष्यात येत नाही.
त्याच हि असाच होतं. तो देवदूत, काहीतरी दैविसंकेत घडतो आणि त्याला जाग येते. त्याच काम एकच, त्याच्या वहीत लिहिलेल्या सूचना पाळायच्या. त्या वहीत पहिली सूचना हीच असते की अमुक एका ठिकाणी लिहिलेल्या सूचना त्याच वहीच्या विशिष्ठ पानावर उतरून घे.
आणि पुढील सुचनेमध्ये कोणत्यातरी पानाचा क्रमांक असतो, जिथे त्याला पुढील सूचना मिळणार असतात. तो क्रमांक त्याच विशिष्ठ पानाचा असतो जिथे त्यानेच काही वेळापूर्वी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत. पण तो हे विसरलेला असतो. पण इथे हि स्वतःच कार्य अप्रत्यक्षरित्या तो स्वतःच ठरवतोय.
हा देवदूत म्हणजे कॉम्पुटर/microprocessor!!! आणि आपण कॉम्पुटर सुरु करण्यासाठी बटन दाबल की तो दैविसंकेत त्याला मिळतो आणि तो जागा होतो. आणि त्या अमुक ठिकाणी (first boot device) जाऊन तो तिथे लिहिलेल्या सूचना (operating system) त्याच्या वहीत (main memory/RAM ) नोंदवून घेतो. नंतर यथाकर्म तो त्या पानावर जाऊन त्या सूचनांच पालन सुरु करतो.
जवळून पाहिल्यावर हे लक्ष्यात येईल की प्रत्याक्ष्यात कॉम्पुटर "वाचा, करा, पुढे जा" याच तीन गोष्टींमध्ये अडकला असतो. या मध्ये पण तो आपल्यासाठी म्हणजे output देणार काम फक्त "करा" ह्या stage मध्येच करतो। आणि त्याला येणारी ती काम सुद्धा काही मोजकीच आहेत। जशी की बेरीज, वजाबाकी, logical operations(ANDing/ORing), आणि सगळ्यात महत्वाच कोणत्याही ठिकाणी (memory location) लिहिलेल वाचता येण, कोणत्याही ठिकाणी लिहिता येणं. "पुढे जा" या stage मध्ये तो एका ठराविक ठिकाणी (Program Counter/Instruction Pointer) असलेल्या पत्त्यावर जातो. एकदा त्याने "वाचा, करा, पुढे जा" हे पाळायला सुरुवात केली की तो कोणतीही काम करू शकतो (कोणताही काम करवून घेता येऊ शकतो). कोणताही काम करायला सांगायचं असेल तर त्याच्या सूचना (Executable file) त्यालाच कुठेतरी लिहायला सांगायचं आणि लिहायला सांगणारया सूचने खाली त्या ठिकाणी जाण्याची सूचना टाकायची. आणि गम्मत अशी आहे की त्याच्यासाठी आश्या सूचना लिहायला आपल्याला मदत करतात त्यानेच एका विशिष्ठ ठिकाणी लिहिलेल्या सूचना त्या म्हणजे Operating System...!!!

5 comments:

  1. Good one Dude!

    Its flawlessly BEAUTIFUL SYSTEM!!!
    and great thing about it is, this system's HARDWARE-THE-PEOPLE don't need LOKPAL BILL coz their GOVERNMENT-THE-PROCESSOR don't do corruption at all ;)

    ReplyDelete
  2. chan lihila aahes.. OS just reflects the work we do in day to day life

    ReplyDelete
  3. अरे दोन वर्षांत 2 पोस्ट्स? नियमित लिहीत जा की, छान लिहीतोस!

    ReplyDelete
  4. Mindblowing...!!!!
    Kharach Rohs....तूच तुझ्या कर्माचा शिल्पकार ...!!!!

    ReplyDelete